
छोट्या पडद्यावर महिन्याभरात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. आता ऑगस्ट महिना देखील अशाच काही नवीन मालिकांची मेजवानी घेऊन आलाय. या महिन्यात एक- दोन नाही तर तब्बल तीन नव्या मालिकांची सुरुवात यापूर्वी झी मराठीने दोन मालिकांची तारीख आणि वेळ जाहीर केलीये. आता स्टार प्रवाहने देखील त्यांच्या नव्या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर केलीये. स्टार प्रवाहने त्यांची आगामी मालिका 'लपंडाव' चा नवा प्रोमो शेअर केलाय. ज्यात या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलीये. मात्र नेटकरी पुन्हा एकदा स्टारने चूक केल्याचं म्हणत आहेत.