
गेले काही महिने छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या आहेत. तर काही जुन्या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. आता स्टार प्रवाहवरदेखील लवकरच २ नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कलर्स मराठी पाठोपाठ आता स्टार प्रवाहवर देखील नवीन मालिका सुरू होणार आहेत. त्यामुळे नव्या मालिकांना संध्याकाळची वेळ मिळावी यासाठी जुन्या कार्यक्रमांना डच्चू देण्यात आलाय. कमी टीआरपी असलेल्या दोन मालिका आता नव्या वेळेत प्रसारित होणार आहेत. कोणत्या आहेत त्या मालिका?