

STAR PRAVAH SERIAL OFF AIR
ESAKAL
छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र त्यासाठी काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतायत. झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी मोठी शर्यत आहे. अशातच झी मराठीनेदेखील नव्या मालिकांची घोषणा केली. त्यापाठोपाठ स्टार प्रवाहनेही नव्या मालिकांची घोषणा केली. स्टार प्रवाहवर 'तुझ्या सोबतीने ही मालिका लवकरच सुरू होतेय. मात्र या मालिकेची वेळ रात्री ९ वाजता ठेवण्यात आलीये. त्यामुळे 'नशीबवान' ही मालिका बंद होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. मात्र आता वेगळीच माहिती समोर येतेय.