

STAR PRAVAH SERIAL OFF AIR
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसात काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यामुळे काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. अशातच तीनही वाहिन्यांवर नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली. कलर्स मराठी, झी मराठी आणि स्टार प्रवाह या तीनही वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू होणार आहेत. त्यात स्टार प्रवाहवर 'बाई तुझा आशीर्वाद' ही नवी मालिका येतेय. ज्याचा टीझर समोर आला होता. त्यासोबतच स्टार प्रवाहवर 'आनंदी' ही मालिकादेखील प्रदर्शित होणार आहे. १६ मार्च पासून ही मालिका सुरू होणार आहे. मात्र यासाठी कोणती मालिका निरोप घेणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.