
छोट्या पडद्यावर आता अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीआरपीची स्पर्धा जास्त असल्याने चॅनेलदेखील नवनवीन विषय असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. अशात स्टार प्रवाह आणि झी मराठीवर आता नवीन मालिका येऊ घातल्या आहेत. त्यासाठी जुन्या मालिका मात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. काही मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत जवळच्या ठरतात. त्या मालिकांनी निरोप घेतल्यानंतरही प्रेक्षक त्या कलाकारांना विसरत नाहीत. अशीच एक मालिका आता निरोप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.