

STAR PRAVAH SERIAL OFF AIR
esakal
गेल्या काही महिन्यात अनेक मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यात स्टार प्रवाहच्या काही मालिकांचा समावेश आहे. आता स्टार प्रवाहवर काही नव्या मालिकांची घोषणा करण्यात आलीये. 'मी कात टाकली' ही नवी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका २८ सप्टेंबरपासून रात्री १०. ३० वाजता प्रसारित होणार आहे. त्यासाठी 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेची वेळ बदलण्यात आलीये. ही मालिका रात्री ११ वाजता प्रसारित होणार आहे. आता स्टार प्रवाहने आणखी २ नव्य मालिकांची घोषणा केली आहे. त्यासाठी आता एक मालिका निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय.