

kon hotis tu kay zalis tu
esakal
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. मात्र या मालिकांचं गणित हे त्यांच्या टीआरपीवर अवलंबून असतं. गेल्या काही महिन्यात मराठी मालिकांच्या टीआरपीमध्ये मोठा बदल पाहायला मिळतोय. त्यात काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. तर काही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. गेल्या महिन्याभरात स्टार प्रवाहने तीन नव्या मालिकांची घोषणा केली. त्यातील एक प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर इतर दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्यात. मात्र यासाठी स्टार प्रवाहाची नुकतीच सुरू झालेली मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.