
छोट्या पडद्यावर नवी मालिका आली की चाहत्यांना उत्सुकता असते ती या मालिकेत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार याची. प्रत्येक अभिनेत्रीचा स्वतःचा चाहतावर्ग असतो. त्यात एकाच मालिकेत दोन अभिनेत्री असतील तर बघायलाच नको. अशीच एक मालिका म्हणजे स्टार प्रवाहावरील 'लग्नानंतर होईलच प्रेम'. या मालिकेत अभिनेत्री मृणाल दुसानिस आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर या दोघीही मुख्य भूमिकेत आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या कथानकामुळे या दोघींचे चाहते आमचीच अभिनेत्री चांगली या वादात अडकले आहेत.