
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'थोडं तुझं थोडं माझं' लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. फक्त १४ महिन्यात ही मालिका ऑफ एअर होतेय. तर तिच्या जागी 'नशीबवान' ही मालिका दिसणार आहे. 'थोडं तुझं थोडं माझं' ही मालिका बंद होणार असल्याने प्रेक्षकही नाराज आहेत. नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलंय. अशातच या मालिकेतील मानसी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने एक भावुक पोस्ट शेअर करत आपल्या सहकाऱ्यांचं कौतुक केलंय. तिने सेटवरील फोटो आणि अनुभव शेअर करत मालिकेला भावनिक निरोप दिला आहे.