
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. मात्र मालिकांचा खेळ हा टीआरपीवर अवलंबून असतो. जितके जास्त प्रेक्षक मालिका पाहतील तेवढाच टीआरपी चांगला राहील. त्यामुळेच प्रेक्षकांचं लक्ष वळवून घेण्यासाठी लेखक आणि निर्माते मालिकांमध्ये निरनिराळे बदल करताना दिसतात. अशातच आता मागच्या आठवड्याची टीआरपी यादी समोर आलीये. त्यात स्टार प्रवाहच्या एका मालिकेच्या टीआरपीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे मालिकेच्या मुख्य अभिनेत्याने प्रेक्षकांसाठी खास पोस्टही केलीये.