

HANUMAN ANSH
ESAKAL
तीन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'हनुमान अंश' या चित्रपटाने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू दाखवलीये. इतर सगळ्या चित्रपटांना घाम फोडत हा चित्रपट नफ्याचे रेकॉर्ड मोडतोय. इमरान हाश्मीच्या 'आवारापन' सोबतच दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटालाही धोबीपछाड देणाऱ्या 'हनुमान अंश' चा सध्या सगळीकडे बोलबाला आहे. मात्र या चित्रपटात मुख्य भूमिकेत चक्क एक मराठी अभिनेत्री दिसतेय हे तुम्हाला ठाऊक आहे का? ही अभिनेत्री सध्या स्टार प्रवाहवर काम करतेय.