स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

MI KAAT TAKLI SERIAL NEW PROMO AND LEAD ACTOR FACE REVEALS:स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली' मालिकेचा दुसरा प्रोमो नुकताच समोर आलाय. या मालिकेतील मुख्य अभिनेत्यासाठी एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आलीये.
mi kaat takli new promo.

mi kaat takli new promo.

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ही मालिका म्हणजे 'मी कात टाकली'. या मालिकेचा प्रोमो यापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यात मालिकेतील मुख्य अभिनेत्रीचा चेहरा दाखवण्यात आला होता. आता वाहिनीने आणखी एक प्रोमो शेअर केलाय ज्यात मालिकेतील मुख्य अभिनेता दाखवण्यात आलाय. नागिणीच्या विश्वावर आधारलेल्या या मालिकेत अभिनेत्री सानिका मोजर मुख्य भूमिकेत आहे. ती नागवंशातली आहे. तिला सापांची भीती वाटते मात्र तरीही तिला जुन्या मंदिरांबद्दल जाणून घेण्याची आवड आहे. ती त्याबद्दल अभ्यास करतेय. आता या मालिकेचा पुढील प्रोमो प्रदर्शित करण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com