

aishwarya narkar aamchya ladkya naikbai
ESAKAL
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका सुरू झाल्या. त्यात स्टार प्रवाहवर सगळ्यात जास्त नव्या मालिका पाहायला मिळतायत. त्यातलीच एक नवी मालिका नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालीये. ही मालिका म्हणजे आमच्या लाडक्या नाईक बाई'. १० ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत अतुल काळे, दक्षता जोईल, अमृता धोंगडे मुख्य भूमिकेत आहेत. शाळेतल्या शिक्षिकेची कहाणी यातून पाहायला मिळतेय ज्यात ती मुलांना शिकवून त्यांच्या पायावर उभी करते मात्र घरात तिची किंमत शून्य आहे. आता प्रेक्षकांना या मालिकेचा पहिला भाग कसा वाटला हे पाहूया.