
छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांच्या आवडीचा विषय. या मालिका म्हणजे प्रेक्षकांना विरंगुळा असतो. मालिकांचा विषय, त्यातील कथानक, मालिकांचे कलाकार हे सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणं खूप गरजेचं ठरतं. नाहीतर त्या मालिका काही महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतात. अशाच काही मालिका यापूर्वीही अगदी ३ महिन्यात बंद झाल्यात. मात्र स्टार प्रवाह एकाहून एक उत्तम कथानक असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतंय. आता स्टार प्रवाहवर आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पुन्हा भेटीला येणार आहे.