
गेल्या २ महिन्यात मराठी वाहिन्यांवर काही नवीन मालिकांची सुरुवात करण्यात आली. तर काही मालिका अजून प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. झी मराठी आणि स्टार प्रवाहने त्यांच्या आगामी मालिकांची घोषणा केलीये. त्यात स्टार प्रवाहवर लवकरच 'लपंडाव' ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिका साकारणार आहे. तर तिच्यासोबत रुपाली भोसले आणि चेतन वडनेरे देखील मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. आता स्टार प्रवाहने दुसरा प्रोमो प्रदर्शित केलाय. ज्यात मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलीये. या मालिकेसाठी स्टारची एक मालिका निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय.