
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यात सगळ्यात जास्त मालिकांची संख्या ही स्टार प्रवाहवर येणाऱ्या मालिकांची आहे. आता स्टार प्रवाहने आणखी एका मालिकेची घोषणा केलीये. या मालिकेच्या अभिनेत्रीचा प्रोमो यापूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासूनच प्रेक्षकांना या मालिकेच्या प्रोमोची उत्सुकता होती. आता अखेर स्टार प्रवाहने त्यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केलाय. जो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत. यात स्टार प्रवाहची जुनी नायिका पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसतेय.