
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यात काही झी मराठीवर सुरू झाल्या तर काही स्टार प्रवाहवर. आता स्टार प्रवाहवर आणखी दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाल्यात. त्यातील एक मालिका म्हणजे 'लपंडाव'. यात अभिनेत्री रुपाली भोसले, कृतिका राव आणि चेतन वडनेरे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरी मालिका म्हणजे 'कोठारे व्हिजनची 'नशीबवान'. या मालिकेत अजय पुरकर नकारात्मक भूमिका साकारणार आहेत. तर अभिनेत्री नेहा नाईक मुख्य भूमिका साकारतेय. आता या मालिकेच्या मुख्य अभिनेत्याचा चेहरा समोर आलाय.