
टीजर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित "स्थळ" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबई येथील लॉ कॉलेज येथे प्रदर्शित करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील मुख्याध्यापक उपस्थित मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ट्रेलर लाँच करण्यात आला. ग्रामीण भागातील मुलीच्या लग्नाची रंजक गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली असून, ७ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.