

THARLA TAR MAG
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. संपूर्ण दिवाळी वाया घालवल्यानंतर 'ठरलं तर मग'च्या लेखकांनी मालिकेत नवीन बॉम्ब टाकायचा ठरवलंय. प्रेक्षकांचा मालिकेतील हरवलेला इंटरेस्ट परत आणण्यासाठी आत लेखकाने मालिकेला नवीन वळण द्यायचं ठरवलंय. मालिकेत आता आणखी एका पात्राची एंट्री होणार आहे. अखेर मालिकेत अस्मिताच्या नवऱ्याची एंट्री होतेय. मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षक त्याच्याबद्दल विचारणा करत होते. आता अखेर तो मालिकेत दिसणार आहे.