
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक मालिका भेटीला आल्या. आता ऑगस्ट महिन्यातही तीन नवीन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाल्यात. त्यात झी मराठीच्या दोन मालिका आणि स्टार प्रवाहची एक मालिका आहे. झी मराठीच्या 'वीण दोघातली ही तुटेना' आणि 'तारिणी' ही मालिका आजपासून म्हणजेच ११ ऑगस्ट पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर स्टार प्रवाहची 'लपंडाव' ही मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अशातच आता स्टार प्रवाहने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केलीये. लवकरच ही मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय.