
गेल्या काही वर्षात कलाकारांच्या घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. काही दिवसांपासून क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावर झळकणारी लोकप्रिय अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने देखील घटस्फोट घेतल्याचं समजतंय. ती एकट्याने मुलाचा सांभाळ करतेय. तिने मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तिच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आल्याचं दिसतंय. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिलीये.