

THARLA TAR MAG
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' गेले काही वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. ही मालिका गेले तीन वर्ष टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. नुकतेच मालिकेने १००० भाग पूर्ण केलेत. यानिमित्ताने सेटवर सेलिब्रेशनदेखील करण्यात आलं. त्यामुळे सगळेच आनंदात आहेत. अशातच मालिकेत कायम निरनिराळे ट्विस्ट येत असतात. मालिकेतील याच गमती कलाकार आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसतात. आता मालिकेतील कलाकाराने असाच एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे जो पाहून प्रेक्षक खुश झालेत. यामुळे मालिकेत नवीन पाहुणा येणार असल्याची हिंट मिळालीये.