गुडघ्याला बाशिंग पण समोरून नकार; लग्नाची नवी परिभाषा सांगणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

Hashtag Tadaiva Lagnam Trailer Release : ट्रेलरमध्ये अथश्री आणि गायत्री ही दोन परस्पर विरोधी व्यक्तिमत्वं त्यांच्या लग्नासाठी एकमेकांना पहिल्यांदा भेटताना दिसत असून या दरम्यान काही गंमतीशीर घटना घडताना दिसत आहेत.
hashtag tadaiva lagnam
hashtag tadaiva lagnamesakal
Updated on

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत लग्नाचे वारे वाहताना दिसतायत. कांदे पोहे, ठरावाठरवी, पसंती, केळवण, बॅचलर पार्टी मग लग्न यासगळ्यात वाढू आणि वर दोघांचीही अगदी त्रेधा तिरपीट उडते. परंतु, या सगळ्या गोष्टी सहज घडत नाहीत. लग्नच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात. मात्र अथश्री आणि गायत्री यांच्या लग्नाच्या गाठी बांधायला देव विसरला का? याचं उत्तर मिळेल ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ या चित्रपटात. सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांचा नवा चित्रपट ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यापूर्वी त्याचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com