तुमचं तुम्ही बघायचं... लग्न झाल्यावर सोहम आणि सुनबाईला वेगळा संसार थाटून देणार आहेत सुचित्रा बांदेकर; म्हणाल्या- माझ्या सासूबाईंनी मला...

SUCHITRA BANDEKAR ON SON WEDDING: लोकप्रिय अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी मुलगा सोहम याला लग्नानंतर वेगळा संसार थाटायला लावणार असल्याचं सांगितलं आहे.
SUCHITRA BANDEKAR
SUCHITRA BANDEKARESAKAL
Updated on

'वाहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि 'होम मिनिस्टर' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते आदेश बांदेकर यांच्या लेकाच्या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सोहम सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी संभाळतोय. अशातच राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार तो लवकरच अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं समोर आलंय. आता सुचित्रा बांदेकर यांनी मुलाखतीत लेकाच्या लग्नावर भाष्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com