हिरोइनला एवढी नटवी केली की... 'बागबान'चित्रपटावर संतापल्या सुहास जोशी; म्हणाल्या- मराठीची कॉपी करून...

SUHAS-JOSHI-BAGHBAN-MOVIE-CONTROVERSY: लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी 'बागबान' या चित्रपटाबद्दल त्यांचं मत मांडलं. यात त्या संतापलेल्या दिसल्या.
suhas joshi on baghban

suhas joshi on baghban

ESAKAL

Updated on

'झिम्मा', 'मुंबई पुणे मुंबई २', 'प्रेमासाठी', 'बोगदा' यांसारख्या असंख्य चित्रपटात आपल्या अभिनयाची ताकद दाखवणाऱ्या सुहास जोशी यांनी मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. इतकंच नाही त्यांचं हिंदीमध्येही आपलं असं हक्काचं स्थान आहे. 'मुंज्या' मधली त्यांनी साकारलेली आजी सगळ्यांच्या लक्षात आहे. मात्र सुहास यांनी मराठी 'बागबान'मध्ये काम केलेलं हे तुम्हाला ठाऊक आहे का? 'बागबान' या चित्रपटाची कथा सुहास जोशी यांच्या 'तू तिथे मी' या सिनेमावरून घेण्यात आली. मात्र त्याचं कोणतंही क्रेडिट चित्रपटाच्या लेखकांना, दिग्दर्शकाला देण्यात आलं नाही. याबद्दल सुहास यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलं होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com