

Marathi Entertainment News : राजवीर हा ॲक्शन चित्रपट आता येत्या १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
अर्थ स्टुडिओ यांनी सारा मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन्स, समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. साकार प्रकाश राऊत, ध्वनि साकार राऊत, गौरव परदासनी, सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते, तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत. साकार राऊत आणि स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. साकार राऊत यांनी यापू्र्वी ‘संघर्ष यात्रा’’, ‘अजूनी’ अशा काही मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. राजवीर या चित्रपटाद्वारे ते हिंदीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्याशी केलेली बातचीत..