
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आथिया शेट्टी नुकतीच आई झालीये. तिने मार्च महिन्यात एका मुलीला जन्म दिला. अभिनेत्याने त्याबद्दल एक पोस्ट करत नेटकऱ्यांसोबत आपला आनंद शेअर केला होता. सुनील शेट्टी कायमच आपल्या नातीबद्दल बोलताना दिसतात. तिचं कौतुक करताना दिसतात. मात्र आता सुनील शेट्टी यांनी एक मुलाखतीत स्वतःच्या मुलीचं कौतुक करताना इतर स्त्रियांचा अपमान केल्याचं बोललं जातंय. या मुलाखतीत त्यांनी आथियाच्या डिलिव्हरीचा उल्लेख केला. तिने सी-सेक्शनऐवजी नैसर्गिक प्रसूतीचा पर्याय निवडला, म्हणूनच त्यांना तिचा अभिमान वाटतो, असं ते म्हणाले मात्र त्यापुढे ते जे म्हणाले त्यामुळे नेटकऱ्यांच्या रागाचा पारा चढलाय.