
भारतात कुठे कुणाच्या नावाने काय प्रकरण समोर येईल याला काहीच नेम नाही. कधी एमपीएससीच्या हॉल तिकिटांवर शाहरुखचा फोटो दिसतो तर कधी कलाकारांच्या नावाने इतरांना गंडा घालताना दिसतो. छत्तीसगढमध्ये असाच एक प्रकार समोर आलाय. विवाहित महिलांसाठी असलेल्या सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका व्यक्तीने चक्क सनी लिओनीच्या नावाने खातं उघडलं आणि त्यात प्रत्येक महिन्याचे १ हजार रुपये आले देखील. आता हे प्रकरण समोर आल्यानंतर सगळेच चकीत झालेत.