

suraj chavan daughter
esakal
'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सुरज चव्हाण कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याने त्याच्या वागण्याने 'बिग बॉस माराठी ' मध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. घरातून बाहेर येताच त्याने संजनासोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते कायम उत्सुक असतात. सुरजने फार खडतर काळ पाहिलाय ज्यामुळे त्याला आता मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची किंमत आहे. आणि त्याच्या याच स्वभावामुळे अनेक चाहते त्याच्याशी जोडलेले राहतात. काही दिवसांपूर्वीच सुरजला मुलगी झाली. तिला पाहण्यासाठी सूरज हॉस्पिटलमध्ये गेला होता तेव्हाही तिथे चाहत्यांची गर्दी होती. आता त्याने थाटामाटात मुलीला घरी आणलंय. त्यात तिचा चेहरादेखील दिसतोय.