
'बिग बॉस मराठी ५' मध्ये आपल्या साधेपणाने सगळ्यांची मनं जिंकणारा लोकप्रिय रीलस्टार सुरज चव्हाण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. सुरजने आपल्या व्हिडिओमधून सगळ्यांचं मनोरंजन केलं. त्याने 'बिग बॉस मराठी ५' जिंकल्यानंतर त्याला केदार शिंदे यांनी 'झापुक झुपूक'या सिनेमाची ऑफर दिली. मात्र त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. आता तर एका इन्फ्लुएन्सरने सुरजने त्याचा डायलॉग चोरल्याचा आरोप केला आहे.