

suraj chavan on ajit pawar
esakal
आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातला काळा दिवस म्हणून ओळखला जाईल. आज २८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त करतेय. लोकांची कामं करणारा नेता गेला अशी भावना सध्या जनमानसात आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. आता 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता सुरज चव्हाण यानेही दादांसाठी डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट शेअर केलीये.