
सध्या मुलामुलींच्या लग्नाचं वय वाढतंय. कुणी अगदी २० व्या वर्षी लग्न करतंय मात्र बहुतेक तरुण पिढी ही ३० वर्ष उलटूनही लग्न करताना दिसत नाहीत. अशात लग्नाच्या वाढलेल्या वयावर अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी भाष्य केलंय. त्यांचं लग्नही उशिरा झालं. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यामागचं कारणही सांगितलंय. सुरेखा यांनी नुकतीच सेलिब्रिटी कट्टाला मुलाखत दिली. यात त्या मुलामुलींच्या वाढणाऱ्या अपेक्षांबद्दलही सांगितलंय.