
'बीवी नंबर १' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन हिने तिच्या 'ताली' आणि 'आर्या' या वेबसीरिजमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. तिने कायमच वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला. सुष्मिता मिस युनिव्हर्स ठरल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली होती. मात्र आता ती इंडस्ट्रीमधील सगळ्यात नावाजलेली अभिनेत्री आहे. ती कायम आपल्या नियमांवर आयुष्य जगली. मात्र मॉडेलिंग करत असताना एका कोक कंपनीने तिला रिजेक्ट केलेलं. तिने त्याचा सूड घेतला कसा घेतला होता तो किस्सा तिने सांगितला आहे.