
Entertainment News: 'छावा' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि नुकताच मोठ्या दिमाखात या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. ट्रेलरने प्रेक्षकांचं मन तर जिंकून घेतलं आहे पण बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीला अनेक मराठी कलाकारदेखील या चित्रपटात दिसणार आहे. त्यातील पहिलं नाव आहे आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सुव्रत जोशी. सुव्रत विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.