
छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुयश टिळक. 'का रे दुरावा' या लोकप्रिय मालिकेतून तो घराघरात पोहोचला. तो अनेक मालिका आणि चित्रपटात देखील दिसला. सुयश नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत संपर्कात असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सुयशच्या वैवाहिक आयुष्यात सारंकाही आलबेल नसल्याचं दिसतंय. त्याच्या एका पोस्टमुळे आता चर्चांना उधाण आलंय.