
मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट दिले आहेत. आता ‘जिलबी’च्या निमित्ताने मराठीतील दर्जेदार कथा हिंदी प्रेक्षकांसमोरही सादर होणार आहे. हा प्रवास केवळ भाषेचा नाही, तर मराठी कलाकारांच्या आणि संकल्पनांच्या विस्ताराचा आहे. मराठी आणि हिंदी प्रेक्षकांसाठी गुन्हेगारी थरारपट 'जिलबी' 21 फेब्रुवारी २०२५ ला अल्ट्रा झकास (मराठी) आणि अल्ट्रा प्ले (हिंदी) या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च केला गेला! ही कथा आहे मुंबईत घडलेल्या एका रहस्यमय हत्याकांडाची, ज्याने संपूर्ण पोलीस यंत्रणेला हादरवून सोडले आहे.