
'दुनियादारी' हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीचा माइलस्टोन म्हंटला जातो. या चित्रपटाने मराठी सिनेमाला नवी ओळख मिळवून दिली. कित्येक आठवडे हा चित्रपट थिएटरमध्ये दणक्यात सुरू होता. या चित्रपटाने प्रेक्षकांना प्रेमाची नवीन भाषा शिकवली. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलेलं. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी श्रेयसच्या भूमिकेत दिसलाय. सिनेमात त्याला एक आजार असल्याने त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यावरून आजही अनेक मीम शेअर केले जातात. शिवाय स्वप्नीलला अनेकदा नाकातून रक्त काढून दाखव ना असंही म्हटलं जातं. आता एका मुलाखतीत त्याने यावर उत्तर दिलंय.