
आयुष्यात प्रत्येक गोष्ट गमावत असलेली ती आणि आयुष्यातली प्रत्येक लढाई हरत असलेला तो "मुंबई लोकल"च्या प्रवासात एकमेकांना पाहतात. तिथून त्यांची गोष्ट सुरू होते. या प्रवासातच त्यांच्या प्रेमकहाणीला हिरवा सिग्नल मिळतो. पण त्यांच्या आयुष्यात अस काय काय घडतं याची रंजक गोष्ट या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. दोघांमध्ये फुलत जाणाऱ्या नात्याप्रमाणेच चित्रपटाचा ट्रेलर ही हळूहळू उलगडत जातो आणि नक्कीच उत्सुकता वाढवतो . प्रथमेश आणि ज्ञानदा ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र येत असल्याने चित्रपटाला नवा आयाम मिळाला आहे.