

snehlata vasaikar
esakal
मराठी मालिकाविश्वातील अनेक अभिनेत्री आहेत ज्या हिंदी मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसतात. मानसी साळवी, उषा नाडकर्णी, सुप्रिया पिळगावकर, स्नेहा वाघ यांच्यासह अनेक अभिनेत्री हिंदी मालिकांमध्ये दिसतात. या अभिनेत्रींनी हिंदी प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केलीये. अशातच आता आणखी एक अभिनेत्री हिंदी मालिकेत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी मालिकांमधील गाजलेली खलनायिका आता हिंदीमध्ये सगळ्यांची झोप उडवायला येतेय.