

SWATI DEVAL
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे स्वाती देवल. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'माझी तुझी रेशीमगाठ' असो किंवा 'लक्ष्मीनिवास' प्रत्येक मालिकेत तिने तिची वेगळी छाप पाडली. तिने मराठीसोबतच ‘मनपसंद की शादी’ सारख्या हिंदी मालिकेतही काम केलं. मात्र स्वातीचा इथवरचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. तिने जिद्दीने हे यश मिळवलंय. मात्र करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यातही ती तितकीच स्ट्रगल करत होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्वातीने तिच्या गरोदरपणातील स्ट्रगलबद्दल सांगितलंय.