"आपल्या महाराष्ट्रात दाक्षिणात्य चित्रपटाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा व पराक्रमाची यशोगाथा उलगडण्याचा इतिहास लोकांसमोर येण्यापासून रोखला गेला आहे."
कऱ्हाड : छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम, त्यांचे स्वराज्यासाठीचे योगदान युवा पिढीपुढे जाणे आवश्यक आहे. त्यासाठी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज (Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj Movies) हा चित्रपट महत्त्वाचा आहे. मात्र, अचानकपणे येथील चित्रपटगृहासह राज्यातील अनेक चित्रपटगृहांत तो दाखवणे बंद केले आहे. एक दाक्षिणात्य चित्रपट चित्रपटगृहात दाखविला जात आहे. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.