

_TAAPSEE PANNU
ESAKAL
सध्याच्या जगात फॅशन आणि फिटनेस ही अनेक मुलींची प्राथमिकता असते.आपण सुंदर दिसायला हवं यासाठी मुली वाट्टेल ते करायला तयार असतात. झिरो फिगर दिसावं म्हणून कधीकधी औषधांचं सेवनही केलं जातं. काहीजण खूप कठीण असं वर्क आउट करताना दिसतात. असंच काहीतरी अभिनेत्री तापसी पन्नूदेखील करत होती. ओटीपोटावरील चरबी कमी करण्यासाठी ती खूप जास्त व्यायाम करत होती. मात्र खरं तर झिरो फिगरपेक्षा तंदुरुस्त असणं जास्त गरजेचं असतं हे तापसी पन्नूला खूप उशिरा लक्षात आलं. त्यामुळे तरुणींनी ही चूक करू नये रस्ताही तापसीने खास स्टोरी शेअर केलीये.