
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. ही मालिका गेली १२ वर्ष अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मालिकेतील जेठालाल गडा, तारक, हाथी भाई, भिडे, टप्पूसेना या सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र प्रेक्षकांना सगळ्यात जास्त भावली ती दयाबेन. आपल्या कुटुंबासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी दयाबेन एक आदर्श पत्नी, सून आणि आई होती. मात्र गेली अनेक वर्ष दयाबेन कार्यक्रमातून गायब आहे. दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी हिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र ती परत आलीच नाही. आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ती बिकिनीमध्ये दिसतेय.