
छोट्या पडद्यावर असे अनेक अभिनेते आहेत जे छोट्या भूमिका करूनही प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करतात. त्यांनी साकारलेल्या छोट्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. असाच एक अभिनेता म्हणजे दया शंकर पांडे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतून दया घराघरात पोहोचला. त्याने मालिकेत चालू पांडे नावाच्या पोलिसाची भूमिका साकारली आहे. त्याने यापूर्वी अनेक चित्रपटात काम केलंय. आमिर खानचा 'लगान', अजय देवगणचा 'गंगाजल' आणि शाहरुख खानचा 'स्वदेश' यांसारख्या चित्रपटाचा तो एक भाग होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आमिर खानबद्दलचा एक अनुभव सांगितलाय.