Entertainment News: तारक मेहता का उलटा चष्मा मधुन घराघरांत पोहोचलेली सोनू भिडे म्हणजेच झील मेहता नुकतीच लग्नबंधनात अडकली. २८ डिसेंबरला तिने बॉयफ्रेंड आदित्य दुबेबरोबर लग्नगाठ बांधली. या खास क्षणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर तिने शेअर केले आहेत. .झीलने 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये लहान वयातच खूप लोकप्रियता मिळवली होती. २०१२ मध्ये वैयक्तिक कारणांमुळे शो सोडण्याचा निर्णय घेतला. झील आणि आदित्यच्या लग्नाच्या सोहळ्याला कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींनी हजेरी लावली. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. .झीलने तिच्या विवाहासाठी पारंपारिक लाल लेहंगा परिधान केला होता, ज्यावर नाजूक जरी काम, भरतकाम आणि हलक्या गुलाबी, हिरव्या आणि सोनेरी रंगांच्या नक्षीकामाने सजवलेले होते. तर,आदित्यने पांढऱ्या रंगाचा शेरवानी परिधान केला होता, ज्यामुळे दोघेही अतिशय आकर्षक दिसत होते. या विवाह सोहळ्यातील वरमाला समारंभातील त्यांच्या आनंदी आणि भावनिक क्षणांनी चाहत्यांचे मन जिंकले आहे.झील आणि आदित्यच्या या नव्या जीवनप्रवासासाठी अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत..'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आत्माराम भिडेची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी झील मेहताला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले, “अभिनंदन झील उर्फ सोनू! क्षमस्व, मी तुझ्या आयुष्यातील या सुंदर क्षणाचा साक्षीदार होऊ शकलो नाही. शूटिंगमुळे हजर राहता आलं नाही, पण माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्यासोबत आहेत. तुमचं वैवाहिक जीवन आनंदमय जावो.” .झीलच्या लग्नाच्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली की, तिला यापूर्वी कधीही इतका आनंद झाला नव्हता. ती इतकी आनंदी आहे की तिला तिच्या भावना कशा व्यक्त कराव्यात, हेच समजत नाही. तिच्या या खास क्षणांसाठी चाहत्यांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..Mouni Roy: न्यू इयर पार्टीवरून जात असताना धपकन खाली पडली मौनी रॉय, उठताच झाकला चेहरा .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.