
बिग बजेट बॉलीवूड चित्रपटांची वर्चस्वशाही कधीपर्यंत चालणार? असा प्रश्न प्रत्येक मराठी चित्रपट निर्मात्याला पडतो. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची एक स्वतंत्र ओळख आहे, पण बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांच्या गाजलेल्या वादळात स्थान मिळवणं हे आजकाल अवघड बनलं आहे. मुळातच मराठी चित्रपटांना १५० ते २०० स्क्रीन महाराषट्रात दिल्या जातात, ज्यामुळे त्यांना लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो आणि ते बॉक्स ऑफिसवर धडपडत राहतात. परंतु आता बिग बजेट चित्रपटांच्या वर्चस्वामुळे रुखवत ह्या मराठी चित्रपटाला केवळ ४० स्क्रीन मिळाल्या. अशा परिस्थितीतही, मराठी माणसांच्या प्रामाणिक पाठिंब्यामुळे आणि परंपरा व संस्कृतीशी नाते जोडलेल्या कथानकामुळे हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल्ल झाला आहे.