
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. त्याचा प्रत्येक चित्रपट वेगळा असतो आणि त्यातल्या भूमिकादेखील वेगळ्या असतात. त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्याच्याइतकीच त्याची पत्नी अनिनिर्मीती ताहिरा कश्यपदेखील लोकप्रिय आहे. तिला पुन्हा एकदा कर्करोगाचं निदान झालंय. नुकतीच ताहिराने एक मुलाखत दिलीये. त्यात तिने तिच्या मुलाखतीत आयुष्मानच्या वागण्याबद्दल वक्तव्य केलं आहे. लग्नानंतर वर्षभर ती घर चालवत होती. आणि याची आयुष्मानला मुळीच जाणीव नव्हती असं ती म्हाणालीये.