
'सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता तानाजी गळगुंडे याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. 'सैराट' नंतर त्याने अनेक चित्रपटात काम केलं. चित्रपटात काम करता करता तानाजी शेतातही काम करतो. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पायावर तब्बल १० ऑपरेशन झाले. त्यानंतर तो व्यवस्थित चालू लागलाय. मात्र आता तानाजी एका वेगळ्याच कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. या नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा उघड केला आहे, तर त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावरील प्रेमाची जाहीर कबुली दिलीये.