
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजे मंदार चांदवडकर. म्हणजेच गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी असलेले भिडे मास्तर. मुलांना शिकवताना ते सोसायटीची जबाबदारीही उत्तम सांभाळतात. मात्र खऱ्या आयुष्यात भिडे मास्तरांसोबतच त्यांची पत्नीदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे हे फार कमी जणांना ठाऊक आहे. इतकंच नाही तर मंदार यांच्या पत्नी सध्या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये दिसत आहेत. अनेकांनी त्यांना ओळखलं नाहीये.