
Taran Adarsh Chhaava Review: ज्या सिनेमाची मराठी माणूसच नव्हे तर देशभरातील शिवप्रेमी आणि संभाजी महाराजांवर प्रेम करणारा प्रत्येकजण आवर्जून वाट पाहत होता, तो सिनेमा म्हणजे छावा आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच रिलीज झाला आहे. अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल झाल्यानं अनेक चित्रपटगृहांमध्ये या सिनेमासाठी हाऊसफुल्लचा बोर्ड झळकला आहे.
पण एक कलाकृती म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा सिनेमा कसा आहे? अप्रतिम! या केवळ एकाच शब्दांत प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या सिनेमाचा रिव्ह्यू केला आहे. त्याचबरोबर याला साडेचार स्टारही दिलेत. या सिनेमावर त्यांनी सविस्तर भूमिका देखील मांडली आहे.